प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल येथे स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमा पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी, प्राचार्या अनिता पाटील, व्यवस्थापक राहुल अहिरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी यांनी उत्साह व आनंद दाखवला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्य प्रदर्शनाने सर्वांची वाहवा मिळवली. तसेच इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य प्रदर्शनात महाराजांना महाराजांना वंदन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर नर्सरी ते सातवीच्या विद्यार्थी व शिक्षकांसोबत रॅली काढण्यात आली. उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी व फलक लेखन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका मयुरी यांनी मानले. मोठ्या उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.