मेथी (ता. शिंदखेडा) येथील ग्रामविकास अधिकारी प्रवीण मोरे, नरेश सोनवणे, निमखेडीच्या ग्रामसेविका तारकेश्वरी सोनवणे, छाईल/नाडसे (ता. साक्री) येथील ग्रामविकास अधिकारी सुनील लाड यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला. ग्रामसेवक चंद्रकांत पवार, टेंभे (ता. साक्री) येथील ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे, ग्रामसेविका मेघा भामरे, वर्शी (ता. शिंदखेडा) येथील ग्रामसेवक प्रभाकर भामरे यांना पुरस्कार देण्यात आला. ग्रामसेविका पूनम शिंदे, सुनंदा राठोड, विहीरगाव (ता. साक्री) येथील गीता बैरागी व ग्रामसेविका वासंती पावरा यांना पुरस्कार देण्यात आला.
धुळे : जिल्ह्यातील 12 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांना सन 2012-15 या तीन वर्षांच्या कालावधीतील जाहीर झालेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे एकत्रित वितरण जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, महिला व बालकल्याण सभापती वंदना गुजर, शिक्षण व आरोग्य सभापती नूतन पाटील, कृषी सभापती लीलावती बेडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी के. एच. राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, अनिल सोनवणे, बाळासाहेब बोटे, कार्यकारी अभियंता वाय. एस. बिर्हाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय. बी. साळुंखे, जिल्हा परिषदेचे सदस्य कामराज निकम, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, कार्यालयीन अधीक्षक रमेश शेळके आदी या वेळी उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह या वेळी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांनी मनोगत व्यक्त केले.