पिंपरी :-* आज आपण भारताचा स्वातंत्र्यदिन आपण मोठया उत्साहात साजरा करत आहोत, मागील वर्षी आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरूवात केली आणि शहरात विविध कार्यक्रम साजरे केले आहेत. आता अमृतमहोत्सवाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने वाटचाल करताना “माझी माती माझा देश” हे अभियान महापालिकेच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांतिदिनापासून राबविले जात आहे,या कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींनी तसेच शहरातील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सहभाग दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे सांगून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शहरवासीयांना स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छाही दिल्या.
पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त सिंह यांच्या हस्ते सकाळी ८.१५ वाजता भारतीय राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दल तसेच तृतीयपंथी ग्रीन मार्शल, रिव्हर मार्शल आणि सुरक्षा दलाच्या वतीने सलामी देण्यात आली तसेच राष्ट्रगीत गायनानंतर सर्व उपस्थितांनी पंचप्रण शपथही घेतली.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, मुख्य लेखापरिक्षक राजेंद्र भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, शहर अभियंता मकरंद निकम, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ,माजी नगरसदस्य गोविंद पानसरे,सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपआयुक्त विठ्ठल जोशी,रविकिरण घोडके, अजय चारठाणकर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे ,ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात,अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर, यशवंत डांगे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, यांच्यासह महापालिका कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, चारुशीला जोशी तसेच कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर महापालिकेत सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांना जीवदान देणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचा आयुक्त सिंह यांच्या हस्ते पदक आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यात सेवानिवृत्त लिडिंग फायरमन तानाजी चिंचवडे, अशोक इंगवले आणि सुभाष लांडे यांचा “सुरक्षित सेवापुर्ती पदक” देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सिनीअर फायरमन सोमनाथ तुकदेव, वाहन चालक लक्ष्मण बंडगर, फायरमन विठ्ठल सपकाळ यांचा “अग्निशमन सेवा पदक” देऊन तर उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले आणि वाहन चालक प्रदीप भिलारे यांना “अग्निशमन सेवा विशेष बचाव पदक” देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच महापालिका, स्मार्ट सिटी आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत ऍकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या “देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत” प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेल्या शाळा तसेच संस्थाना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये १ ली ते ४ थी गटात प्रथम क्रमांक सिटी प्राइड स्कूल निगडी, द्वितीय क्रमांक प्रेरणा प्राथमिक विद्यालय निगडी, तृतीय क्रमांक एस. बी. पाटील स्कूल रावेत यांनी पटकावला. तर ५ वी ते ७ वी गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या शाळांमध्ये अमृता विद्यालय, पोदार इंटरनेशनल स्कूल, पिं. चिं. प्राथमिक शाळा कुदळवाडी क्र ८९ या शाळांचा समावेश होता. ८ वी ते १० वी गटामध्ये रसिकलाल एम धारीवाल, स्कूल सरस्वती विद्यालय, समर्थ माध्यमिक विद्यालय या शाळांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
कॉलेज गटात प्रथम क्रमांक रसिकलाल एम धारीवाल कॉलेज, द्वितीय क्रमांक डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज पिंपरी आणि तृतीय क्रमांक सरस्वती माध्यमिक विद्यालयाने पटकावला. तसेच सोसायटी गटामध्ये प्रथम क्रमांक पलाश को. ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, द्वितीय क्रमांक जी. के. पॅलेसीओ हाउसिंग सोसायटी, तृतीय क्रमांक पोलाइट पॅनोरमा सोसायटीने पटकावला. कंपनी/कॉर्पोरेट कर्मचारी गटात प्रथम क्रमांक निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटल, द्वितीय क्रमांक एमक्युअर फार्मासुटिकल्स, हिंजवडी तर तृतीय क्रमांक आयकॉन हॉस्पिटलने पटकावला या सर्वाना स्मृतिचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी रक्तदान करून मानवतेच्या महान कार्यामध्ये सहभाग नोंदवला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड हेरिटेज वॉकचा शुभारंभ देखील आयुक्त सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला. हा उपक्रम शहरातील नागरिकांना शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळांशी जोडण्याचा एक दुवा असून रहिवासी आणि अभ्यासकांना शहराच्या इतिहासातील समृद्ध वारसा अनुभवता व पाहता येईल.
दरम्यान, राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर निगडी भक्ती शक्ती चौक या ठिकाणी शहीद क्रांतीकारकांना अभिवादन करून देशभक्तीपर गीतांचा आणि “माझी माती, माझा देश” सुलेखनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात वृक्षारोपण आणि पंचप्रण शपथ घेण्यात आली यावेळी आमदार उमा खापरे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,माजी नगरसदस्य नामदेव ढाके,ॲड.मोरेश्वर शेडगे, उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
निगडी येथील कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक विवेक पांडे, आशिष देशमुख, पृथ्वीराज इंगळे आणि गायिका राधिका अत्रे यांनी “भारत देश है मेरा” ,”सारे जहा से अच्छा हिन्दोस्ता हमारा” ‘ये देश है वीर जवानों का” अशी देशभक्तीपर गीते सादर केली.तर चिंतन मोढा यांनी त्यांना साथ देत अप्रतिम असे संगीत संयोजन करून उपस्थितांची मने जिंकली. सुप्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांच्या सुरेख अशा सुलेखनाने आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
दरम्यान अग्निशमन विभागाकडून निगडी ते पिंपरी अभिवादन वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन रॅलीमध्ये जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासमवेत अग्निशमन विभागातील उप अग्निशमन अधिकारी अनिल डिंबळे, विनायक नाळे, गौतम इंगवले, दिलीप गायकवाड, बाळासाहेब वैद्य, वाहनचालक मंगेश देवगडकर, मुकेश जगताप, फायरमन अनिल निकम, ट्रेनी सब ऑफिसर अभिजीत पाटील, लक्ष्मण बेदरे, चत्तरसिंग बेडवाल, बापूसाहेब जाधव तसेच ट्रेनी फायरमन अनिकेत काशिद, पंकज चौधरी, निखील जगताप, सुशांत शिनगारे, अभिषेक भांगे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि मुख्य प्रशासकीय इमारतीमधील राष्ट्रध्वजाला वंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पंचप्रण शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थितांचे आभार मानले.