चौफेर न्यूज – देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाल्यानं राज्यातील दहावी, बारावी, एमपीएससी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CBSE 10वी परीक्षा रद्द तर 12 वी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

देशातील कोरोनाची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल शिक्षक सचिव व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा केली. या बैठकीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाच्या च्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या बैठकीमध्ये परीक्षा घेण्याच्या शक्यते विषयी एक आराखडा पंतप्रधान यांच्या समोर मांडण्यात आला. गेल्यावर्षीप्रमाणे ऑनलाईन परीक्षांचा मुद्दाही या मध्ये होता देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता (सीबीएसई बोर्ड एक्झाम 2021) रद्द करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची चर्चा पार पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here