अनुसूचित जाती , अनुसूचित जाती-जमाती (आदिवासी) हे भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित देशी लोकांचे भारताच्या राज्यघटनेने मान्य केलेले दोन गट आहेत. भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या काळात ते डिप्रेस्ड क्लास (मागास वर्ग) म्हणून ओळखले जात होते. अनुसूचित जातींमध्ये कितीतरी टक्के लोक मूलत: भारतीय समाजाच्या खालच्या थरातील लोक आहेत. आधुनिक साहित्यात अनुसूचित जातींचा उल्लेख कधी कधी आदि-द्रविड (?) म्हणून होतो.
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या लोकांचे प्रमाण अनुक्रमे १६.६% आणि ८.६% आहे. या दोन समूहांची एकत्रित लोकसंख्या ही २५.२% (३१ कोटी) आहे, जर ही संख्या एक देश म्हणून गृहीत धरली तर हा चीन, भारत व अमेरिका ह्यांनंतर जगातला चौथा सर्वात मोठा देश ठरू शकतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या संविधानाद्वारे या मागास समजल्या जाणाऱ्या समूहांना आरक्षण लागू करण्यात आले. आणि कलम (अनुसूचित जमाती) आदेश १९५०, २२ राज्यांतील ७४४ जमातींची नोंद करते.
धार्मिक लोकसंख्या
संविधान (अनुसूचित जाती) आदेश (सुधारणा) कायदा, १९९० नुसार, अनुसूचित जातींचा धर्म फक्त हिंदू, शीख किंवा बौद्ध असू शकतो. अनुसूचित जमातींना कोणताही विशिष्ट धर्म नाही. २००६ च्या सच्चर समितीच्या अहवालात भारतीय वंशाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आज हिंदू धर्मापर्यंत मर्यादित राहिल्या नाहीत. आदिवासींनी आम्ही हिंदू नसल्याची याचिक सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले की आदिवासी (अनुसूचित जमाती) हे हिंदू धर्मीय नाहीत. एनएसएसओ च्या ६१ व्या फेरी सर्वेक्षणात आढळले की, भारतामधील ९०% बौद्ध, ७५% शीख आणि ७५% ख्रिश्चन हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ठ आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण बौद्ध लोकसंख्येतील ६८% (५७.५७ लाख) लोक ‘अनुसूचित जाती’ (प्रवर्गातील) आहेत.
जात प्रवर्गाचे धर्मानुसार अनुसूचित अनुसूचित इतर मागास इतर % एकूण%
वर्गीकरण (२००४-०५) जाती % जमाती % वर्ग %
हिंदू २२.२ ९.१ ४२.८ २६ १००
मुसलमान ०.८ ०.५ ३९.२ ५९.५ १००
ख्रिश्चन ९.० ३२.८ २४.८ ३३.३ १००
शीख ३०.७ ०.७ २२.४ ४६.१ १००
जैन ०० २.६ ३० ९४३ १००
बौद्ध ६८ ९ ०.४ २.७ १००
पारशी ०.० १५.९ १३.४ ७०.४ १००
इतर २.६ ६.२ ८.७ १००
एकूण ९५ ८ ७ ४ ३० १००
- महाराष्ट्रातील अनुसूचित जाती
- लोकसंख्या (२०११)
एकूण – ११,२३,७४,३३३
- अनुसूचित जाती – १,३२,७५,८९८ (११.८१%)
- पुरुष – ६७,६७,७५९
- स्त्रिया – ६५,०८,१३९
कुटूंबे
- एकूण कुटूंबे – २,३८,३०,५८०
- अनुसूचित जातींची कुटूंबे – ३३,११,४०५
- दारिद्ररेषेखालील कुटूंबे (२००२-०७)
एकूण दारिद्र्यरेषेखालील कुटूंबे – ४५,०२,३८५
पैकी अनुसूचित जातींची कुटूंबे – १०,१२,००० (२२.४८)
- गावे
एकूण गावे – ४१,९५९
- १००% अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेली गावे – ३४
- ५०% पेक्षा अधिक अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेली गावे – ७०२
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या एकूण वस्त्या – ३७,६०४
- साक्षरता प्रमाण (२०११)
- एकूण साक्षरता प्रमाण (२०११) – ८२.०३%
- अनुसूचित जातींची साक्षरता – ७९.०७%
- कृषि गणना (२००५-०६)
- एकूण भूधारक संख्या – १,१४,३०,०००
- अनुसूचित जातींची भूधारक संख्या – १०,५६,००० (९.२५%)
- भूधारकांकडे एकूण जमीन – १,६८,९४,००० हेक्टर्स (१.६८ कोटी हेक्टर्स)
- अनुसूचित जातींच्या भूधारकांकडील एकूण जमीन – १२,२०,००० हेक्टर्स (१२.२० लाख हेक्टर्स)
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत १२% किंवा १ कोटी ३५ लाख लोकसंख्या ही अनुसूचित जातीच्या लोकांची आहे. महाराष्ट्रातील ५९ जातींचा अनुसूचित जातींत समावेश होतो. यांत महार, मांग व चांभार हे तीन समाज लोकसंख्येनुसार अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
सौ. विकीपीडीया