पिंपरी :- पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने पिंपरी करंडक २०२२ – २३ भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नवमहाराष्ट्र विद्यालय येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन ह.भ.प.श्री. माउली महाराज वाळूंजकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.
या विषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले कि, सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री.संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगण येथे दिनांक २५ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत दिवसरात्र स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. क्रिकेट स्पर्धेसाठी कै.सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठी १,२१,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक तसेच कै.सौ.सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे ७१,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक, तृतीय क्रमांकासाठी कै.श्री.दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ ३१,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक, कै.श्रीमती रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी २१,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे. तसेच ४० वर्षावरील खेळाडूंसाठी (४० प्लस) कै. श्री योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठी ३५,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक व कै.श्री.राजेश शंकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठी २५,०००/- रुपयांचे पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक संदीप वाघेरे, संतोष कुदळे, चंद्रशेखर अहिरराव, सुभाष शांताराम वाघेरे, सुभाष वाघेरे, रवींद्र कदम, अक्षय नाणेकर, उमेश खंदारे, सुनील पवार, कमलेश वाघेरे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेचे नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, सचिन वाघेरे, गणेश मंजाळ, दीपक मुंगसे, राग्वेंद्र भांडगे यांनी केले आहे.