चौफेर न्यूज – महाराष्ट्रात कोरोना वाढत असून यामुळे जुलैपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. रेड झोनमध्ये नसलेल्या भागात शाळा सुरू करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. यामुळे जुलै महिन्यात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जातील. तसेच सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग ऑगस्टपासून सुरू केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि अधिकारी सहभागी झाले होते.

तसेच यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. तर सप्टेंबरपासून तिसरी ते पाचवीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समित्यांच्या शिफारशीनंतरच पहिली आणि दुसरीचे वर्ग सुरू केले जाऊ शकातात. तसेच ज्या भागात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शाळा उघडता येत नाहीत, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिकविले जाऊ शकते. जेणेकरून त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये. राज्यात कोरोनामुळे स्थिती बिकट आहे. यामुळे शाळा-महाविद्यालयांचे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. आता सरकारने खबरदारी म्हणून ते पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here