चौफेर न्यूज – जेईई मेन एप्रिल सत्रासाठी परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची आणि परीक्षा फी भरण्याची मुदत 7 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. जेईई मेन एप्रिलच्या सत्रासाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र नंतर जाहीर केले जाणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करायची आहे त्यांनी अधिकृत वेबसाईट nta.nic.in ला भेट द्यावी. वेबसाईटवर लॉगीन डिटेल्सद्वारे अर्जात दुरुस्ती करता येईल. 

जेईई मेन अर्जात दुरुस्ती कशी करायची?

स्टेप 1: जेईई मेन एप्रिल सत्र परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी एनटीए जेईईची अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2: होम पेजवर उपलब्ध जेईई मेन 2021 रजिस्ट्रेशन अर्जात दुरुस्ती या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3: यानंतर नवीन पेज ओपन होईल, तिथे विद्यार्थ्यांनी त्यांचे लॉगीन डिटेल्सच्या मदतीनं लॉगीन करावं
स्टेप4 : अर्जात आवश्यक ते बदल करा आणि अर्ज सबमिट करा.
स्टेप 5: हे पृष्ठ डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

दोन सत्रात होणार परीक्षा

एनटीएकडून जेईई मेन एप्रिलच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 25 मार्च 2021 पासून सुरू झाली. त्याचबरोबर एप्रिल सेशन पेपर 1 (बी.ई.बी.टेक) साठी आयोजन केले जात आहे. ही परीक्षा 27, 28, 29 आणि 30, 2021 एप्रिल रोजी घेण्यात येईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. त्यानुसार पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात येणार आहे.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.

B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांना विशेष सूचना

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आली आहे. B.Arch आणि B.Planning च्या विद्यार्थ्यांनी मे सत्रातील परीक्षेला अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण एप्रिल सत्रातील परीक्षा केवळ B.E. आणि B.Tech साठी पेपर आयोजित केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here