पिंपरी : थरमॅक्स चौक, संभाजीनगर, चिंचवड येथे गुरूवारी (दि. 20 ऑक्टोबर) सिट्रस हॉटेल समूहातील तीन तारांकित हॉटेल क्रुझचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी खासदार गजानन बाबर, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, नगरसेविका शारदा बाबर, नगरसेवक उल्हास शेट्टी, नगरसेवक प्रकाश बाबर, माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर वैशाली घोडेकर, राजेश पिल्ले, भगवान वाल्हेकर, बाबासाहेब धुमाळ, सिट्रस हॉटेलचे सीईओ गौरव पालीयाल, बाळासाहेब महाडीक आदी उपस्थित होते.
शिवतारे पुढे म्हणाले की, फक्त नोक-यांच्या पाठीमागे न धावता इतरांना नोक-या देण्याचे काम मराठी माणसाने करावे, असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. मराठी माणसांत प्रचंड क्षमता आहे; पण त्याने स्वतःला ओळखले पाहिजे. हळूहळू सर्व व्यवसायात आता मराठी माणूस पुढे येतो आहे.
सुमारे पन्नास हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेल्या अत्याधुनिक हॉटेल क्रुझमध्ये बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स हॉल, अद्ययावत अशा 36 रूम्स तसेच 24 तास आणि 7 ही दिवस चालणारे रेस्टॉरन्ट अशा सुविधा निर्माण करणा-या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
माजी खासदार गजानन बाबर यावेळी म्हणाले की, पूर्वी आम्ही तीनही भावंडांनी किराणा दुकानात कामं करून आपला उदरनिर्वाह केला. अनेक प्रकारचे छोटे व्यवसाय करीत आमचे पोट भरत गेलो तसे समाजालाही काहीतरी देत गेलो. कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही; तर त्यासाठी प्रचंड कष्ट आणि जिद्द आवश्यक असते! अशा भावना व्यक्त केल्या.
गजानन बाबर यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे पाहून, आम्ही एवढं वैभवशाली हॉटेल उभं केलं; पण तुम्ही विमानतळ पुरंदरला नेल्यामुळे आमचं हॉटेल आता कसं चालेल? असे म्हटल्यावर श्रोत्यांमध्ये हास्यकल्लोळ उडाला; परंतु शिवतारे यांनी, संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता पुरंदर हेच विमानतळासाठी योग्य ठिकाण आहे. तुम्ही पुरंदरला यापेक्षाही मोठं पंचतारांकित हॉटेल उभं करा! असे प्रत्युत्तर आपल्या मनोगतातून दिल्यावर श्रोत्यांनी टाळ्या वाजवून पसंती दर्शवली.कार्यक्रमाचे संयोजन संजय ढेंबरे, अनिल भांगडिया, नामदेव पोटे, माधुरी बाबर, योगेश बाबर यांनी केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर बाबर यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.
मराठी माणसाने स्वतःला ओळखावे : शिवतारे
