चौफेर न्यूज – राज्यात कोरोना विषाणूचा वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेत राज्य सरकारने इयत्ता १० वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु दहावीचा निकाल कसा आणि कधी लागणार यावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकाल प्रक्रियेबाबत केवळ उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. परंतु राज्य सरकार या परीक्षांबाबत केव्हा आणि काय निर्णय घेईल या निर्णयाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी आणि पालक आहेत.दरम्यान विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग वाढत असल्याने परीक्षा केंद्रावर बोलवत परीक्षा घेणे धोक्याचे असल्याने सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा राज्य मंडळानेही इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्याचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इतर राज्यांकडूनही दहावीच्या निकालाबाबत कोणत्या उपाययोजना केल्या जातात याबाबत विस्तृत अभ्यास करत निकाल स्पष्ट केले जातील असे सांगण्यात आले होते.

मात्र अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाबद्दल कोणतीही घोषणा न झाल्याने विद्यार्थ्यांनामध्ये गोंधळाचे वातावरण यला मिळत आहे. दरम्यान सीबीएसई बोर्डाने वर्षभर ऑनलाईन शाळांनी केलेल्या मूल्यमापनाच्या आधारावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केल जाणार असल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. परंतु राज्य सरकारने याबाबत अद्याप कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही.

दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा आत्तापर्यंत तीन महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकांत विद्यार्थ्यांच्या इयत्ता ९ वीतील गुणांचा आधारे दहावीचा निकाल जाहीर करावा तसेच दहावीच्या अंतर्गत मूल्य़मापनाचे आधारे निकाल जाहीर करावा आणि इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात यावी अशा अनेक पर्यायांवर चर्चा झाल्या. परंतु अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु राज्य सरकारने दहावीच्या निकालांवर फक्त चर्चा न करता अंतिम निर्णय घ्याव अशी अपेक्षा समितीतील सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी विद्यार्थ्यांना पुढील अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येत नाही, कारण इयत्ता दहावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना अकरावीच्या अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो. मात्र प्रवेश पूर्व परीक्षेचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. मात्र कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रवेश पूर्व परीक्षा घेणार का? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी राज्य सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here