चौफेर न्यूज – गेल्या दोन वर्षांपासून अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ४ ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये देखील सुरु करावी अशी मागणी सध्या राज्यभरातील विद्यार्थी करत आहेत. यावर राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी

“UGC च्या म्हणण्यानूसार नविन शैक्षणिक वर्ष येत्या १ नोव्हेंबरपासून सुरु करावे अशा सुचना आहेत मात्र दिवाळी तोंडावर असल्याने दिवाळीनंतर महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता आहे, तसेच कॉलेज सुरु करताना सर्वच विद्यार्थांना एकाच वेळेस बोलवलं जाणार नाही, तर विद्यार्थांना टप्प्याटप्प्याने महाविद्यालयात बोलवलं जाईल” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here