चौफेर न्यूज – केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) दहावी परीक्षेचा निकाल 20 जून रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र, आता हा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सीबीएससीने मंगळवारी नोटीस जारी करत दहावीच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स सबमिट करण्याचा कालावधी वाढवला आहे.

याबाबत सीबीएसईकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले, की विविध राज्यांत कोरोना महामारी, लॉकडाऊन, शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या शेड्युलनुसार तारखा

– मार्क अपलोड करण्यासाठी सीबीएसई पोर्टल उपलब्धता – 20 मे.

– सीबीएसईला मार्क्स सबमिट करण्याची शेवटची तारीख – 30 जून, 2021

– इंटरनल असेसमेंट मार्क्स (20 पैकी) सबमिट करण्याची तारीख – 30 जून, 2021

दरम्यान, सीबीएसईने 1 मेला सांगितले होते की, जून 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित केला जाईल. मात्र, मार्क्स सबमिशनची तारीख वाढवून जुलैमध्ये जारी केली जाईल. यापूर्वी शाळांना इंटरनल असेसमेंटचे मार्क्स 11 जूनपर्यंत सीबीएसई पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे होते. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निका जुलै महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here